About Us

राम, राम शेतकरी मित्रांनो,

jalsiddhi.com च्या या डिजिटल platform वरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे.

तर शेतकरी मित्रांनो, jalsiddhi.com ही वेबसाईट बनवण्याच्या मागचा आमचा उद्देश इथे फक्त माहितीच देणे नसून प्रत्येक शेतकरी बांधवांना शेती या विषयामध्ये साक्षर बनवणार आहोत. शेतीच्या प्रत्येक गोष्टीमधील आणि ज्याची शेतकरी बांधवांना खरी नितांत गरज आहे अशाच योग्य आणि शास्त्रशुद्ध माहितीचा ठेवा आपण या वेबसाईटच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत.

या वेबसाईटवरती तुम्हाला नेमकं काय काय पाहायला मिळेल?

तर आपल्या शेतातील पिकाला फक्त पाणी, खते एवढंच नाही, तर त्याला माणसासारखं एक संतुलित आणि पोषक जेवण म्हणजेच अन्नद्रव्ये लागतात. या अनुषंगाने आम्ही इथे खालील विषयांवरती माहिती देणार आहोत.

  • पिकांचे पोषण: शेतातील पिकांच्या वाढीसाठी कोणकोणती आवश्यक अन्नद्रव्ये आहेत? आता त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य या सर्वांची सखोल, शास्त्रशुद्ध व अभ्यासपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजेल असे पद्धतीने देणार आहोत.
  • जिवाणूची ताकद व महत्त्व: रानातील मातीमध्ये काम करणारे प्रत्येक जिवाणू जसे की ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम, रायझोबियम तसेच केएसबी, पीएसबी, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, बॅसिलस या सर्व जिवाणू आणि बुरशीनची माहिती शेतकरी बांधवांना माहीत नसतात. ते आपण एकदम सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्याचे महत्त्व आणि वापरण्याच्या पद्धतीही ते नेमके कसे काम करतात.
  • सेंद्रिय खते व त्यांचा वापर: जसे की ह्युमिक ॲसिड, फुलविक ॲसिड आणि सीवीड एक्सट्रॅक्ट यांसारख्या गोष्टींचा वापर आणि फवारणीतून देण्याच्या पद्धती तसेच मुळाशी देण्याची आळवणी व याचा फायदा शेतीस कसा होईल याबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती.
  • एकात्मिक कीड नियंत्रण व जैविक पद्धती: शेतातील पिकांवरती येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या किडी व त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या निसर्गातील कोणकोणते मित्र कीटक आहेत व ते आपल्या पिकामध्ये कीड नियंत्रणासाठी कसे काम करतात व त्यांचे संवर्धन आणि त्यांचा वापर आपल्या पिकांमध्ये करून पिकातील कीड नैसर्गिक रित्या कशी आटोक्यात आणावी.
  • पीक व्यवस्थापन आणि मार्गदर्शन: सीजन वाईज कोणकोणती पिके घ्यायची, कोणकोणती पिके घेऊ नये, कोणत्या सीजनमध्ये कोणत्या समस्यांना शेतकरी बांधव सामोरे जातात, तसेच वेगवेगळ्या पिकांसाठी लागणारे वेळापत्रक जसे की पीक कधी लावावे, लावणीनंतर काय करावे, त्यानंतर फुलधारणेमध्ये काय करावे, फळधारणेमध्ये काय करावे, कीड नियंत्रणासाठी काय करावे, तसेच पिकाच्या शाकीय वाढीसाठी काय करावे, पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी काय करावे, जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे याबद्दलचे सर्व पिकांसाठी लागणारे वेळापत्रक
  • पिकांचे बाजारभाव आणि विक्री कौशल्य: बरेच शेतकरी बांधवांना व्यवस्थित पिकवता येते परंतु विकता येत नाही आणि बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना आपण कोणते पीक लावतोय त्या पिकाचा सध्या मार्केटमध्ये काय दर चालू आहे, बाजारभाव काय चालू आहेत याबद्दल माहिती नसते. याबद्दलही आपण महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर कुठे कुठे त्या पिकांसाठी दर चांगले आहेत त्याबद्दलचे मार्केटचे रिसर्च आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना प्रोव्हाइड करणार.

आमची बांधिलकी

जलसिद्धी परिवार मानतो की शेती हा फक्त व्यवसाय नाही, तर ती एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेली मूल्यवान पुंजी आहे. मित्रांनो आपण आज मातीत चांगले सेंद्रिय घटक आणि जिवाणू सोडले, तर उद्या हीच काळी आई आपल्याला भरघोस आणि दणदणीत पीक देईल. शेतकऱ्याला स्वत:च्या शेतातला शास्त्रज्ञ बनवणं आणि सेंद्रिय शेतीचा खरा अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचवणं, हाच jalsiddhi.com चा वसा आहे.