­­­­ड्रॅगन फळची शेती करा व कमी खर्चात अधिक नफा कमवा | Dragon Fruit Farming in Marathi 2025

Dragon Fruit Farming: अलीकडच्या काळात बहुतांश शेतकऱ्यांचे लक्ष हे आधुनिक शेतीकडे केंद्रित झालेले आहेत. कमी वेळेत, कमी खर्चात, कमी कष्ट करून आजकाल सर्व शेतकरी जास्त उत्पन्न घेण्याच्या मार्गावर लागलेले आहे त्यामुळे शेतामधील नवनवीन प्रयोग व फळबागेतील विदेशी पिकांची मागणी पाहता.

अलीकडे ड्रॅगन फळ शेती करण्याकडे सर्व शेतकऱ्याचा वेग वाढला आहे. ड्रॅगन फळ शेती  शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्यामुळे. ड्रॅगन फळ शेतीची जास्तीत जास्त चर्चा केली जात आहे. हे फळ थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका  या देशात लोकप्रिय असून  सध्या आपल्या भारतात म्हणेच  महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडु, तेलंगणा आणि मध्यप्रदेश राज्यांमध्ये याची लागवड झपाट्याने वाढत आहे. तर

कमी कष्टांत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा  देणाऱ्या या फळाची शेती कशी केली जाते या बद्दल सविस्तर माहीती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Dragon Fruit Farming
Dragon Fruit Farming

ड्रॅगन फळाची सविस्तर माहीती | Dragon Fruit Farming Information

  • ड्रॅगन फळाला, (पिताया ) असे सुद्धा म्हणतात. आणि त्याचे वैज्ञानिक नाव हे ( Hylocereus undatus) असे आहे. हे फळ कॅक्टस वर्गातले आहे त्यामुळे ते  उष्ण हवामानात अधिक चांगले वाढते म्हणून हे  उष्ण कटिबंधीय फळ आहे.
  • त्यांची बाहेरील त्वचा थोडी काटेरी गुलाबी रंगाची  असते, तर आतून गर पांढरा किंवा गुलाबी रंगाचा असतो.
  • . हे फळ  चवीने  आणि औषधी गुणधर्मांमुळे जगभरात प्रसिद्ध होत आहे.कारण या फळात अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात.
  • ड्रॅगन फळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले गेले आहे, विशेषतः डायबेटीस आणि हृदयविकारांवर उपयुक्त आहे.
  • ड्रॅगन फळाची दरवर्षी मागणी वाढत असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढत आहे.व अनेक तरुण शेतकरी आता पारंपरिक शेतीऐवजी ड्रॅगन फळ शेतीकडे वळत आहेत.
  • ड्रगन फळाची एकदा लागवड केली की झाड 15 ते 20 वर्षांपर्यंत उत्पादन देते. आणि ड्रॅगन फळाचा उपयोग रस, जॅम, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. बाजारात या फळाला ₹100 ते ₹400 प्रति किलो दर मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.

ड्रॅगन फळाबद्दलची वैशिष्ट्ये

ड्रॅगन फळाचे मुख्य तीन प्रकार –

  1. गुलाबी सालीत पांढरा गर (Red skin, white flesh)
  2. गुलाबी सालीत लाल गर (Red skin, red flesh)
  3. पिवळ्या सालीत पांढरा गर (Yellow skin, white flesh)
  • हे फळ आपल्या देशातले नसून मेक्सिको व दक्षिण अमेरिका या देशांतले आहे  परंतु आजकाल या फळाची मागणी  आता आपल्या भारतात ही केली जाते आणि अनेक भागात हे फळ यशस्वीपणे पिकवले जात आहे. वजन:
  • प्रत्येक ड्रगन फळाचे वजन हे साधारणतः 200 ग्रॅम ते 700 ग्रॅम दरम्यान एवढे असते. योग्य  काळजी घेतली तर काही फळे 1 किलोपर्यंतही वाढू शकतात.

ड्रॅगन फळशेती साठी हवामान आणि जमीन निवड

ड्रॅगन फळासाठी उष्ण आणि कोरडे हवामान अनुकूल असते. व यासाठी 25°C ते 35°C  तापमान उत्तम राहील. या फळाला पाण्याचे प्रमाण कमी लागते, त्यामुळे कमी पाण्याच्या क्षेत्रातही त्याची लागवड होऊ शकते. या फळासाठी मुरमाड, ड्रेनेज होणारी, आणि वालुकामय जमीनची निवड केली जाते. आणि  मातीचा pH 5.5 ते 7.0 असावा. ज्या जमिनीत पाणी साचत नाही आणि हवेची मांडणी चांगली आहे, तिथे ड्रॅगन फळाची वाढ चांगली होत असते.

Dragon Fruit Farming
Dragon Fruit Farming

ड्रॅगन फळाची लागवड कशी केली जाते ?

  • सर्वात आधी ड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी योग्य प्रजाती निवड केली जाते. यासाठी पांढरे, लाल किंवा गुलाबी फळ असलेल्या प्रजातींमध्ये निवड करुन त्या झाडांच्या गुणसूत्रांची तपासणी करतात. नंतर  ड्रॅगन फळासाठी निचरा होणारी, हलकी, वाळूयुक्त जमिनीत झाडांना 5-6 फूट अंतरावर लावले जाते, म्हणजे त्यांना वेल वाढवण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी स्थान मिळेल.
  • ड्रॅगन फळ कॅक्टस आहे, त्यासाठी त्याला RCC पोल्स, लोह/लोखंडी सळी व वायरिंग वापर केला जातो यामुळे झाडांना वाढीसाठी योग्य आधार मिळतो आणि फळांचे उत्पादन वाढते.हे ड्रॅगन फळ कमी पाणी घेणारे झाड आहे. म्हणून ड्रिप सिंचन पद्धतीचा वापर करून,फळांना अधिक पाणी मिळते आणि पाण्याची बचत सुद्धा केली जाते.
  • झाडांना योग्य पोषण मिळवण्यासाठी ऑर्गॅनिक खत किंवा NPK (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम) चा वापर केला जातो. झाडांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊनच  योग्य प्रमाणात खत देणे  अत्यंत आवश्यक असते. कारण ड्रॅगन फळाला अलिकडच्या किडी आणि रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक कीटकनाशक वापर करावा . दर महिन्याला तपासणी करावी.
  • ड्रॅगन फळाची  8-12 महिन्यांनी पक्व होण्यास सुरू होते. फळांच्या गाठींना ठराविक रंग किंवा गंध यावरून त्यांची पिकलेली अवस्था समजली जाते.

Dragon Fruit Farming
Dragon Fruit Farming

ड्रॅगन फळ काढणी व मिळणारे उत्पादन

  1. उत्पादनची सुरुवात: 8-12 महिने
  2. पूर्ण उत्पादन: 2-3 वर्षांपासून
  3. दरवर्षी 4-6 वेळा फळ येते
  4. एक झाडाचे उत्पादन: 10-20 किलो
  5. फळांचे वजन: 300-700 ग्रॅम
  • काढणीचा हंगाम: ऑगस्ट ते डिसेंबर
  • एका हेक्टरमधून 10-12 टन उत्पादन मिळू शकते

ड्रॅगन फळाचा बाजारभाव | Dragon Fruit Market

प्रकारबाजारभाव (₹ प्रति किलो)टिप्पण्या
सामान्य दर्जा (साधे फळ)₹100 – ₹150स्थानिक बाजारात विक्रीसाठी
मध्यम दर्जा₹150 – ₹250चांगला रंग, मध्यम गोडसर चव
उच्च दर्जा (निर्यातक्षम)₹250 – ₹400+साइज, रंग व गुणवत्ता उत्तम असल्यास
प्रक्रिया उद्योगासाठी₹80 – ₹120रस, जॅम, वाईन इ. बनविण्यासाठी वापर
  •  ड्रॅगन फळ जर तुम्ही प्रत्यक्ष ग्राहकाला विक्री (Direct Marketing) केली, तर ₹300+ दरही सहज मिळू शकतो. म्हणून हे ऑर्गेनिक ड्रॅगन फळ बाजारात अधिक महाग विकले जाते.

Dragon Fruit Farming
Dragon Fruit Farming

ड्रॅगन शेती खर्च व नफा माहिती (प्रति हेक्टर) अंदाजे

खर्चाचे प्रकारअंदाजे खर्च (₹)
रोपे व लावणी₹80,000 – ₹1,00,000
सपोर्ट सिस्टीम (पोल्स)₹1,50,000 – ₹2,00,000
खत व सिंचन₹50,000 – ₹70,000
मजुरी व देखभाल₹60,000 – ₹80,000
एकूण खर्च₹3.5 – ₹4.5 लाख
उत्पन्न₹8 – ₹12 लाख
नफा₹4 – ₹8 लाख

ड्रॅगन शेतीसाठी मिळणाऱ्या सरकारी योजना व मार्गदर्शन

  • राष्ट्रीय बागायती अभियान (MIDH) अंतर्गत अनुदान योजना मिळू शकते.
  • ड्रिप सिंचन योजनेसाठी 50% पर्यंत सबसिडी सुद्धा  मिळते.
  • सरकारकडून ड्रॅगन फळ शेतीसाठी अनुदानही दिले जाते.

निष्कर्ष

सर्व शेतकरी बांधवांनो  ड्रॅगन फळ शेती ही भविष्यात  उच्च नफा देणारी शेती आहे.तर  ही शेती करणे अत्यंत सोयीस्कर  आणि कमी खर्च, कमी पाणी आणि चांगले बाजारभाव देणारी असल्याने पारंपरिक पिकांपेक्षा अधिक फायदेशीर ठरते. फक्त या साठी योग्य नियोजन, प्रशिक्षणाची आवश्यकता असते.  तेव्हा च शेतकरी लाखोंचा नफा कमवू शकतात.आणि  आपल्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये ही शेती यशस्वी झाली आहे. योग्य तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि मार्केटिंग वापर करून  शेतकरी लाखोंचा नफा कमवत आहे.


हे पण वाचा – किवी शेती खर्च, उत्पादन, नफा, संपूर्ण मार्गदर्शन


Leave a Comment